नाबार्ड सहाय्यित - मेगा पाणलोट विकास कार्यक्रम

पाणलोट विकास चळवळ

योजनेचे नाव : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) अंतर्गत : मेगा पाणलोट विकास कार्यक्रम

योजना सुरू झाल्याचे वर्षे : सन २००९-१०

योजने बद्दलचा शासन निर्णय : नाबार्ड-2014/प्र.क्र.52/जल-7 दि.12 मे, 2015

केंद्र व राज्य निधीचे प्रमाण : राज्य शासन पुरस्कृत योजना

योजनेच्या प्रमुख अटी : शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे

योजनेतील लाभार्थी गट : शासन निर्णया प्रमाणे निश्चित केलेल्या पाणलोटातील गावे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : पाणलोट व स्वयं रोजगारासाठी करीता निधी

अंमलबजावणी यंत्रणा : कृषि विभाग, वन विभाग

क्षेत्रिय संपर्क अधिकारी : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी

योजनेसाठी वर्ष निहाय प्राप्त निधी / खर्च निधी (केंद्र / राज्य ) :

भौतिक साध्य :

उदिष्ट :

 • पाणलोट क्षेत्र विकासाच्या सर्वमान्य उद्दिष्टांसोबत पाणलोट विकासाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कृषि आधारीत स्वयंरोजगाराच्या संधीद्वारे समाज घटकांची आर्थिक उन्नती साधणे.
 • ग्रामसभेच्या मान्यतेने, लोक सहभागातून व त्यांच्या संमतीने स्थानिक परिस्थिती व नैसर्गिक उपलब्ध पायाभूत संसाधनांचा विचार करुन प्रकल्प नियोजन करणे. मृद व जलसंधारण ( in Situ व ex Situ ) या पध्दतीने कामासोबतच संसाधन आधारीत स्वयंरोजगाराचे दीर्घकालीन नियोजन करणे.
 • पाणलोट विकास कार्यक्रमाबरोबरच पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी, भूमिहिन, शेतमजूर, महिला यांचेसाठी उदरनिर्वाहाची साधने निर्माण करण्यासाठी नियोजन व त्याची अंमलबजावणी करणे.
 • पाण्याच्या ताळेबंदाविषयी जनजागृती व सक्षमतेने पाणी वापर या संदर्भात प्रबोधन करणे.
 • दीर्घकालीन शाश्वत रोजगार निर्मितीवर भर देणे व कृषि आधारीत अर्थव्यवस्था बळकट करणे. तसेच वेगवेगळया शेती पध्दती उदा. कृषि व पशुधन विकास, कृषि व फलोत्पादन विकास, कृषि व दुग्ध व्यवसाय इ. ची अंमलबजावणी करणे.
 • दीर्घकालीन शाश्वत देखभाल दुरुस्ती कायमस्वरुपी सहभागी पध्दतीने करण्यासाठी पाणलोट देखभाल निधी उभारणे.

योजनेची सद्यस्थिती :

 • योजनेची व्याप्ती जिल्हे व मेगा पाणलोट संख्या: 9 जिल्हे, 12 मेगा पाणलोट.
 • मेगा पाणलोट क्षेत्र : 1.45 लाख हेक्टर.
 • प्रकल्पाचे मुल्य लाखात : 17137.66 लाख.
 • समाविष्ठ गावांची संख्या : 262 गांवे.
 • क्लस्टर पाणलोट संख्या : 32
 • एकूण प्राप्त निधी (माहे मार्च-16 अखेर) : रु.8802.09 लाख
 • प्रत्यक्ष खर्च (दि.30/09/2016 अखेर) : रु.7242.83 लाख
 • प्रतिपूर्ती दावे नाबार्ड कार्यालयास सादर : रु.6655.58 लाख
 • सन 2016/17 या वित्तीय वर्षाकरीता प्रस्तावीत कार्यक्रम. : रु.2500.00 लाख
 • दि.12.05.2014 च्या शासन निर्णयानुसार : 14 मेगा पाणलोट .
 • (10 जिल्हे, 19 तालुके) योजनेअंतर्गत (25 आधिक 18) 43 क्लस्टर मेगा पाणलोट प्रकल्प.
 • अंतीमत: विकसित करावयाचे
 • पाणलोट व क्लस्टर पाणलोट प्रकल्प
त्यावेळी अव्वल प्ले विराम