निरांचल जागतिक बँक सहाय्यित प्रकल्प

जागतीक बँक सहाय्यीत निरांचल प्रकल्प

केंद्र शासनाने दिनांक 01 एप्रिल 2008 पासून पाणलोट विकासाकरीता सामाईक मार्गदर्शक सूचना 2008 निर्गमित करुन, लागू केल्या आहेत. त्यास अनुसरुन केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालयातील भूसंसाधन विभागाने केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम ( IWMP) जाहीर केला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडून 90 टक्के आणि राज्य शासनाकडून 10 टक्के अर्थसहाय्याची तरतूद होती. आता यापुढे सन २०१५-१६ पासून केंद्र व राज्य निधीचे प्रमाण हे ६0: ४0 टक्के राहील, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची वृध्दी व्हावी म्हणून जागतिक बँक, केंद्र शासनास व केंद्र शासन राज्यांना अर्थसहाय्य करणार आहे.  या मध्ये 08 राज्यांची निवड केलेली असून त्या मध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे.  निरांचल जागतीक बॅंक सहाय्यीत प्रकल्प एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम प्रकल्पाची एकूण किंमत रु.2869 कोटी आहे.  या  योजनेचे समन्वय वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. संदर्भाधीन दिनांक 21 मे, 2008 च्या शासन निर्णयान्वये मा. प्रधान सचिव (जलसंधारण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा गठीत  करण्यात आली असून सोसायटी अधिनियम 1860 अंतर्गत नोदंणीकृत करण्यात आली आहे. निरांचल प्रकल्पाअंतर्गत सन २०१६-१७ या अर्थसंकल्पीय वर्षाकरीता केंद्र हिश्यासाठी,लेखाशिर्ष (४४०२ २४७६) खाली रु.२७००लक्ष व राज्य हिश्यासाठी, लेखाशिर्ष (४४०२ २४५८) खाली रु.३०० लक्ष निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.  सदर निधीतून निरांचल जागतीक बॅंक सहाय्यीत प्रकल्प एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम  या योजनेअंतर्गत, केंद्र हिश्यासाठी सन २०१६-१७ वर्षाकरीता, अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या रु.२७०० लक्ष इतक्या निधीतून रु.५०.०० लक्ष ( पन्नास लक्ष फक्त) एवढे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान व केंद्र हिश्यास अनुसरुन राज्य हिस्सा रु.३३.३३ लक्ष ( तेहतीस लक्ष तेहतीस हजार फक्त)  असे एकूण रु. ८३.३३ लक्ष ( रु.त्र्याऐंशी लक्ष तेहतीस हजार )  निधी शासन निर्णय दि. १८/५/२०१६ नुसार वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेस वितरीत करण्यात आला आहे.

आता केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालयातील भूसंसाधन विभागाच्या, दिनांक २२ नोव्हेंबर, २०१६ च्या पत्रांन्वये, सन २०१६-१७ करीता  लेखाशीर्ष ४४०२ २४७६ खाली केंद्र हिस्सा रक्कम रु. 227.75 लक्ष (रु.दोन कोटी सत्तावीस लक्ष पंचाहत्तर हजार फक्त )वितरीत करण्यात आला आहे.  सदर केंद्र हिश्श्यास अनुसरुन राज्य हिस्सा (४०%)लेखाशीर्ष ४४०२ २४५८ खाली,रक्कम रु. १५१.८३ लक्ष असे एकूण रक्कम रु. ३७९.५८ लक्ष (रु.तीन कोटी एकोणऐंशी लक्ष अठ्ठावन्न हजार) निधी शासन निर्णय दि. १० मार्च २०१७ नुसार वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेकडे वितरित करण्यात आला आहे.

            केंद्रिय भूसंसाधन विभागाच्या, दिनांक २२ नोव्हेंबर, २०१६ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनेनुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय मान्यता समितीच्या बैठकीमध्ये, निरांचल प्रकल्पाच्या वार्षिक कृति आराखडयास मान्यता मिळाल्यानंतर निरांचल प्रकल्पाकरीता निवडण्यात आलेल्या अमरावती व अहमदनगर या दोन जिल्हयांकरीता डी.पी.आर. तयार करणे, प्रशिक्षण केंद्राचे नुतनीकरण, लॅन कनेक्टीव्हीटी, व्हीडिओ कॉन्फोरन्सींग सुविधा व अधिकारीस्तरावर प्रशिक्षण,  कन्सलटन्सी यासाठी सदर निधीचा विनियोग, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा या राज्यस्तरीय नोडल यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.

 

त्यावेळी अव्वल प्ले विराम