प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - पाणलोट विकास (एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम) IWMP

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP)

योजनेचे नाव : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट विकास) पाणलोट

योजना सुरू झाल्याचे वर्षे : सन २००९-१०

योजने बद्दलचा शासन निर्णय : दि. २१ मे, २००८

केंद्र व राज्य निधीचे प्रमाण : केंद्र शासन पुरस्कृत योजना

योजनेच्या प्रमुख अटी : शासन निर्णय व मार्गदर्शक सुचनेत नमुद केल्याप्रमाणे

योजनेतील लाभार्थी गट : सामुदायिक लाभार्थी

अंमलबजावणी यंत्रणा : कृषि विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग व अशासकीय संस्था

क्षेत्रिय संपर्क अधिकारी : प्रकल्प व्यवस्थापक तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

योजनेसाठी वर्ष निहाय प्राप्त निधी / खर्च निधी (केंद्र / राज्य ) :

भौतिक साध्य : २१ लक्ष. हे. क्षेत्र उपचारित

उदिष्ट

केंद्र शासनाच्या सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या पाणालोट क्षेत्र विकास कार्यक्रमांसाठी - सामाईक मार्गदर्शक सूचना २००८ (सुधारित २०११)अन्वये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सन २००९-१० पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. सन २०१५-१६ पासून सदर योजना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट विकास) मध्ये समाविष्ट करण्यात आली असून या योजनेकरीता केंद्र व राज्य शासनाचा निधीचे प्रमाणे ६०:४० करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मृद व जलसंधारण कामांबरोबरच मत्ता नसलेल्या व्यक्तींना उपजीविका तसेच शेतकऱ्यांसाठी सुक्ष्म उद्योजकता व उत्पादन पध्दतीवर आधारित उपजीविका उपक्रम, प्रशिक्षण व संस्था बांधणी, प्रेरकप्रवेश उपक्रम, सविस्तर प्रकल्प अहवाल तयारकरणे, सनियंत्रण व मूल्यमापनइ. घटकांसाठीआणि प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाची तरतूद केली आहे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

महाराष्ट्र राज्यात सन २००९ पासून ४८ लाख हेक्टर क्षेत्राचे ६२५५ कोटींचे ११७० प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत मंजूर ११७० प्रकल्पांसाठी तालुका कृषि अधिकारी - २५४, कृषि अधिकारी (ताकृअ कार्यालय) -५९, मंडळ कृषि अधिकारी ३०९, सामाजिक वनीकरण २९, वन विभाग १७ आणि स्वयंसेवी संस्था ९५ अशा एकूण ७६३ प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण मंजूर ११७० प्राथमिक प्रकल्प अहवालांपैकी ९६३ सविस्तर प्रकल्प अहवाल व ९१९ उपजिवीका आराखडे मंजूर असून क्षेत्रीय पातळीवर प्रकल्पांच्या पूर्व तयारी, अंमलबजावणी टप्प्यातील विविध कामे कार्यान्वीत आहेत.

योजनेची सद्यस्थिती

सन २००९-१० ते २०१४-१५ मधील मंजूर प्रकल्पांसाठी एकूण रु. २१३९ कोटी उपलब्ध झाला असून त्यापैकी माहे जानेवारी २०१६ अखेर रु. २०९१ कोटी (९८%) इतका प्रागतीक खर्च (व्याजासह) झालेला आहे. सन २०१५-१६ वर्षा करिता वार्षिक कृती आराखडा रक्कम रु. १०८० कोटी करिता मान्यता मिळालेली आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण उपलब्ध निधी रु. ५६१.५५ कोटी पैकी माहे जानेवारी २०१६ अखेर रु. ४०७.२२ कोटी खर्च करण्यात आला आहे.

त्यावेळी अव्वल प्ले विराम