अकोला

अकोला

जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
शुक्ल सदन ,दुर्गा चौक,जठारपेठरोड
अकोला: 444005

दुरध्वनी क्रमांक : 2420567
फॅक्स क्रमांक : 2410951
ई-मेल : dioakola@gmail.com

अकोला ‘ मिशन पाणी ’ होतेय लोक चळवळ ....!!

अकोला जिल्हयाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, अकोट आणि तेल्हारा हे दोन तालुके सातपुडा पर्वतराजीच्या पायथ्याशी वसलेले असल्यामुळे तुलनेनी पाण्याच्या बाबतीत सधन आहेत. मात्र बाळापूर , मुर्तिजापूर,पातूर ,बार्शिटाकळी आणि अकोला तालुके पठारी असल्यामुळे पाण्याची पातळी इतर ठिकाणा सारखी मोठया प्रमाणात कमी झालेली आहे. मुर्तिजापूर, अकोला ,अकोटचा काही भाग खारपानपटयात मोडत असल्याने याठिकाणी संरक्षीत पाणी साठे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संपूर्ण जिल्हयाचा पाण्यासाठीचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे.

मागील वर्षी लोकसहभागातून गाळ काढणे व नाला खोलीकरणाच्या कामाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन लोकसहभागातून सुरु झालेल्या 460 कामापैकी 437 कामे पूर्ण झाली आहेत या कामातून 24 लाख 39 हजार 191 घनमिटर गाळ काढला असुन त्यांची अंदाजीत किंमत 28 कोटी 72 लक्ष 31 हजार रुपये इतकी आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यात लोक सहभागातून 12 लाख 44हजार 295 घनमिटर गाळ काढण्यात आला असुन त्याची शासकीय किंमत 20 कोटी 80 लक्ष 86 हजार इतकी आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामासाठी 159 कोटी 73 लक्ष रुपये निधी प्रस्तावीत करण्यात आला होता त्या पैकी 108 कोटी 37 लक्ष निधी प्राप्त झाला, त्यापैकी 64 कोटी 32 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामामुळे पुरेसा जलसाठा संग्रहीत झाला होता. त्यामुळे जुलै ते ऑगस्ट महिन्यात 28 दिवसाच्या पावसाचा खंड पडला तेंव्हा शेतकऱ्यांनी संग्रहीत जलसाठयातून एक पाणी पिकांना देवून पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेचे महत्व समजून आपणहून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.

यावर्षी सन 2016-17 मधे 125 गावाची निवड करण्यात आली असुन यागावात शिवार फेरी पूर्ण करुन गाव आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच ग्रामसभेत कामांना मंजूरी घेण्यात आली आहे. यावर्षी 3581 कामे नव्याने हाती घ्यावयाची असुन अस्तीत्वातील जलस्त्रोताची दुरुस्ती व बळकटीकरण करणे, गाळ काढणे यासारखी 548 कामे करावयाची आहे. सर्व एकूण 4129 कामांना 153 कोटी 28 लक्ष निधीची आवश्यकता आहे. यामध्ये कृषी विभागाच्या 2551 कामाचा , लघु सिंचन जलसंधारण 287, जिल्हा परिषद लघूसिंचन 156, वन विभाग 144, सामाजिक वनीकरण 41, पंचायत समिती कृषि विभाग 934, पाटबंधारे विभाग 4,भूजल सर्वेक्षण 8 व पाणी पुरवठयाचा 4 कामांचा समावेश आहे.

खारपाण पट्टा ..... होतोय ‍हिरवा.

आपातापा हे गांव खारपाणपट्टयात येत असून गावातील संपूर्ण वहिती खालील जमीन कोरडवाहू आहे. येथे सिंचनाची कोणत्याच प्रकारची सोय नाही. अनियमीत पाऊस किंवा पावसातील खंडामुळे एका पाण्याच्या कमतरतेमुळे 50 ते 60 टक्के पिकाच्या उत्पदनात घट होते. या ‍ठिकाणी संरक्षित सिंचनासाठी शेततळे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळे ही वैयक्तीक लाभाची योजना राबविण्यात आली.

श्री.पुर्णाजी श्रीरंग बुंदे, आपातापा ता.जि. अकोला यांच्या 1.21 हे.आर. शेतात 30x30x3 मीटर चे शेततळे तयार करण्यात आले या कामी 1.06 लाख खर्च आला त्यामुळे सदर शेतकऱ्याने खरीप 2014 मध्ये 0.80 हे.आर.जमीन सिंचनाखाली आली. क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली होती. त्यामधून त्यांना 7.5 क्विंटल प्रती हेक्टर एवढे उत्पादन आले. तेवढयाच क्षेत्रावर यावर्षी देखील खरीप 2015 मध्ये सुध्दा कापूस पिकाची पेरणी केली या पिकास शेततळयामधून एक संरक्षीत ओलीत केले. त्यामुळे त्यांना 8.75 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन आले. तसेच खरीप -2014 मध्ये 0.40 हेक्टर क्षेत्रावर मुग पिकाची पेरणी केली त्यापासून त्यांना 125 किलो प्रती हेक्टर एवढे उत्पादन आले व त्यामध्ये रब्बी 2014 मध्ये हरभऱ्यापासून 3.75 क्विंटल प्रती हेक्टर एवढे उत्पादन आले. तेवढयाच क्षेत्रावर यावर्षी खरीप 2015 मध्ये मुग पेरणी केली परंतु पावसाच्या खंडामुळे मुगाचे उत्पादन आले नाही. तेव्हा त्यांनी या क्षेत्रावर शेततळयाच्या पाण्याचा उपयोग करुन ढेमसे या भाजीपाला पिकाचे 0.40 हे.आर. क्षेत्रावर पिक घेतले त्यापासून त्यांना 7000/- रुपयेचे उत्पन्न मिळाले व त्याच क्षेत्रावर ढेमसीला दिलेल्या पाण्याच्या ओलीवर हरभरा हे तिसरे पिक पेरणी केलेले आहे व त्यापासून 5 क्वींटल प्रती हेक्टर उत्पादन अपेक्षीत आहे. शेततळयाचे वर्म व बांधावर दुधी भोपळा व कारले या भाजीपाल्याची शेततळयाचे संरक्षित ओलीतावर लागवड करुन त्यापासून आज रोजी 4000/- रुपये उत्पन्न आले व 2000/- रुपये एवढे उत्पन्न अपेक्षीत आहे.

मागील वर्षी पेक्षा यावर्षी शेततळयाच्या संरक्षित ओलीतामुळे रुपये 20375/- एवढी उत्पन्नात वाढ झाली व त्याला रोजगार सुध्दा उपलब्ध झाला. सदरहु शेतकऱ्यास कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे तांत्रीक मार्गदर्शन मिळाले, पुढील हंगामामध्ये या शेतकऱ्याचे अनुकरण करुन इतर शेततळेधारक शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करण्यास प्रवृत्त झाले आहे.

मनोगत- माझी आपातापा येथे गटक्रमांक 102 मध्ये 3एकर शेती आहे. त्यामधे यावर्षी कृषी विभागाने 30X30 चे शेततळे खोदूनदिले. मी यावर्षी 2 एकरवर कापुस लावला व 1 एकर मुग पेरला होता. कमी पाण्यामुळे मुगआला नाही. त्या जागी मी शेततळयाच्या पाण्यावर ढेंमसे घेतले. त्यापासून मला 7000/- रुपये उत्पन्न मिळाले.

त्याला जागेवर हरभरा पेरला तो चांगला आहे. त्याला कमीत कमी 3 क्विंटल एकरी उत्पादन येईल तसेच कापसाला 1 पाणी दिले. त्यामुळे एकरी साडेतीन क्विंटल उत्पादन आले. मागच्या वर्षी पाणी दिले नव्हते तरी तीन क्विंटल कापूस आला होता. मी शेततळयाच्या बांधावर दूधी भोपळा व कारले लावले. त्यापासून चार हजार रुपये मिळाले. आणखी दोन हजारपर्यंत मिळतील शेततळयामूळे मला फायदा झाला व रोजगार मिळाला . ढेमसे, दूधी भोपळा कारले यापासून तेराहजार रुपये जास्तीचे मिळाले व कापुस सुध्दा जास्त झाला मला माझ्या शेतात शेततळे दिल्या बद्दल मी कृषी विभागाचे आभार मानतो असे मनोगन श्री.पुर्णाजी श्रीरंग बुंदे यांनी व्यक्त केले.

Achievement
अ. क्र. अचीवमेंट फाइल शीर्षक अचीवमेंट फाइल
1 jalyukt-shivar Akola pdf डाउनलोड (53.42 KB)
2 Shettale-Apatapa pdf डाउनलोड (50.31 KB)
त्यावेळी अव्वल प्ले विराम