अनघड दगडांचे बांध

पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत. विशेषत: घळ प्रणालीत अखंड घळीच्या मुख्य प्रवाहात जेथे जलवाहन क्षेत्र 10 हे. पर्यंत असते त्या ठिकाणी असे बांध घालतात. या कामाकरीता जवळपास उपलब्ध असलेल्या अनगड दगडांचा उपयोग करुन कमीत कमी खर्चात दगडी बांध घातले जातात.

उद्देश

  • ओघळीवर आडवे असे अनघड दगडाचे बांध घालून ओघळीमधून वेगाने वाहणा-या पावसाच्या पाण्याचा वेग कमी करणे.
  • जमिनीच्या होणा-या धुपीस प्रतिबंध करणे
  • पाणी थाबवून जमिनीत मुरविणे.
  • दोन बांधात गाळ साचल्यामुळे क्षेत्र समपातळीत होऊन अधिक क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते.
  • बांधाच्या खाली झाडे झुडपांची लागवड करुन झाडोरा तयार करणे.

बांधाचे प्रकार

पाणलोट क्षेत्रानुसार खालीलप्रमाणे अनगड दगडी बांधाचे दोन प्रकार आहेत.

बांधाचे प्रकार
अ.क्र. बांधाचा प्रकार पाणलोट क्षेत्र बांधाची सरासरी उंची
1 लहान अनगड दगडी बांध 5 हे. पर्यंत 0.75 मी.
2 मोठा अनगड दगडी बांध 5 ते 10 हे. पर्यंत 1.00 मी.

जागेची निवड

  • ओघळीमधील अनघड दगडाचे लहान बांधासाठी पाणलोट क्षेत्र 5 हे. पर्यंत व मोठया बांधासाठी पाणलोट क्षेत्र 5-10 हे. पर्यंत असते.
  • पाणलोटातील ओघळी व नाल्याचे जे एल सेक्शन काढलेले आहेत, त्यावरुन प्रत्येक अनघड दगडाच्या बांधाच्या जागा निश्चित केल्या जातात. हया एल सेक्शन वरुन बांधाची जागा निश्चित करताना दोन्ही बांधातील उभे अंतर हे वरील बांधाची तळपातळी व खालील बांधाच्या माथ्याची पातळी यामधील फरक हा नाला तळाच्या शेकडा उताराच्या हिशोबाने व जमिनीच्या प्रकारानुसार 1 टक्के राहील असा हिशोब केला जातो किंवा दोन बांधामधील उभे अंतर 1 मी. पेक्षा जास्त ठेवले जाते.
  • नाला तळयात उघडया खडकावर बांधाची जागा निश्चित करु नये.
  • बांधाच्या जवळपास 1 कि. मी. त्रिज्येत दगड उपलब्ध असतील अशाच ठिकाणी बांध घातला जातो.

अनगड दगडी बांधाच संकल्पचित्र

पाणलोट क्षेत्राचा वरचा भाग (अप्पर रिचेस)

अनघड दगडांचे बांध

पाणलोट क्षेत्राचा मधला भाग (मिडल रिचेस)

अनघड दगडांचे बांध

तांत्रिक मापदंड

तांत्रिक मापदंड
उतार गट तांत्रिक मापदंड
  पाया रूंदी मी. बांधाची उंची मी. माथा रूंदी मी. बाजू उतार बांधाचा काटछेद (चौ.मी.)
पाणलोट क्षेत्राचा वरचा भाग (अप्पर रिचेस) 2.00 0.75 0.50 1:1 0.94
पाणलोट क्षेत्राचा मधला भाग (मिडल रिचेस) 2.50 1.00 0. 50 1:1 1.50
त्यावेळी अव्वल प्ले विराम