ढाळीचे बांधबंदिस्तीची कामे हमखास पावसाच्या प्रदेशात घेण्यात येतात. महाराष्ट्र शासनाचे जलसंधारण विभागाचे शासन निर्णय क्र. जलसं.-1092/सी.आर.182/जल-7 दि.ऑगस्ट, 1992 नुसार समपातळी / ढाळीच्या बांधाऐवजी वनस्पतीजन्य बांधाचे तंत्रज्ञान वापरणे अपेक्षित आहे. त्यानुसार समपातळी मातीचे बांध/ढाळीचे मातीचे बांध व जैविक बांध यांची सांगड घालून समपातळी बांधाचा छेद 0.75 चौ.मी. इतका तर ढाळीचे बांधाचा छेद 0.45 चौ.मी. इतका ठेवून दोन बांधामध्ये उतारानुसार एक किंवा दोन जैविक बांध घेवून कामे करण्यात येत होती. तथापी नियोजन विभाग शासन निर्णय क्र.रोहयो 2007/प्र.95/रोहयो-1/दि. 16 जुलै 2007 अन्वये ढाळीचे बांध बंदिस्तीची कामे पुर्वी प्रमाणेच 0.95 चौ.मी., 1.05 चौ.मी. व 1.20 चौ.मी. छेदाची करणेस मान्यता दिली आहे.
ढाळीचे बांधबंदिस्तीमध्ये पाणी साठवावयाचे नसते. स्थरीकृत बांधालाच थोडया प्रमाणात उतार देउन बांधावरील क्षेत्रात गोळा झालेले पाणी बांधाच्या वरच्या बाजूला साचून न राहता बांधाच्या वरच्या बाजूने सावकाशपणे वाहून शेताचे बाहेर काढले जाते. त्यामुळे मातीची धुप होत नाही व बांधावर पाण्याचा दाब पण पडत नाही. या उपचारासाठी तांत्रिक
जमिनीचा प्रकार/उतार गट | तांत्रिक मापदंड | ||||||||
पायारूंदी मी. | बांधची उंचीमी. | माथारूंदी मी. | बाजू उतार | बांधाचा काटछेद चौ.मी | बांधाची लांबीमी. | गवती सांडवा संख्या | शेतचर घ.मी. | ||
भारी जमिन | 2.50 | 0.80 | 0.50 | 1.25:1 | 1.20 | 95 | 2 | 43.20 | |
मध्यम जमिन | 2.30 | 0.75 | 0.50 | 1.20:1 | 1.05 | 165 | 3 | 43.20 | |
हलकी जमिन | 2.00 | 0.75 | 0.50 | 1:1 | 0.95 | 210 | 4 | 43.20 |
गवती सांडवा व शेतचर कामासाठीची रक्कम मंजूर मापदंडामध्ये समाविष्ट आहे.