गडचिरोली

गडचिरोली

जलयुक्त शिवार अभियान सन 2015 - 16

मुत्तापूर / दिनाचेरपल्ली ता. अहेरी

यशोगाथा

सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र - 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान सन 2015 - 16 पासुन सुरु करण्यात आले. अनियमित व अनिश्चित स्वरुपाचा पाऊस व त्यामुळे दुष्काळ सदृश परीस्थिती उदभवत असल्यामुळे टंचाई परिस्थतीतीवर कायमस्वरुपी मात करणेसाठी एकात्मिक पध्दतीने नियोजन करुन पाण्याची उपलब्धता वाढविणेसाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार गावनिहाय कामाचे नियोजन कारण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात‍ अहेरी हा नक्षल प्रभावीत व दुष्काळग्रस्त तालुका असुन तालुक्याचे भौगोलीक क्षेत्र 89472.14 हेक्टर आहे. वहितीखालील क्षेत्र 17056 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तालुक्यात भात, सोयाबिन, कापूस, तीळ इत्यादी पीके घेतली जातात. या पीकांमध्ये भात हे मुख्य पीक घेतले जाते. जमीन मध्यम व हलक्या प्रतीची आहे. पाऊसमान बरे असले तरी पाऊस पडतो आणि वाहून जातो. पाऊस सरासरीने जरी जास्त असला तरी तो पुर्वीसारखा नियमीत पडत नाही. पिकांना संरक्षीत पाणी देण्याची पुरेश्या प्रमाणत सोयी नसल्यामुळे उत्पादनावर परीणाम होतो.

जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात निवड केलेल्या 152 गावांपैकी अहेरी तालुक्यात 7 गावांची निवड करण्यात आली. यामध्ये मुत्तापुर/ दिनाचेरपल्ली, मोदुमतुर्रा, मोसम, गोलाकर्जी, गोविंदगाव, जिमलगट्टा व उमानुर या गावांचा समावेश आहे.

या अभियानांतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये ग्रामसभा घेवून तसेच शिवार फेरीचे आयोजन करुन मृद व जलसंधारणांच्या कामांची महिती. पटवून देण्यात आली. कृषी दिंडीचे आयोजन करुन प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या मागणी नुसार मजगी,बोडी व शेततळे घेण्याचा शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अहेरी तालुक्यात शेततळयाची 49 कामे, बोडीचे 11 कामे व मजगीची 12 गटांची कामे असे एकुन 72 कामे करण्यात आली. शेततळयाच्या 49 कामांकरीता रुपये 5649125/- करण्यात आला. बोडीच्या 11 कामाकरीता रुपये1064355/- खर्च करण्यात आला. आशाप्राकरे तालुक्यात झालेल्या एकुन 72 कामारीता रुपये 7298760/- खर्च करण्यात आला.

मुत्तापुर/दिनाचेरपल्ली हे गाव आलापल्ली चंद्रपुर मार्गावर असुन तालुका मुख्यालयापासुन 10कि.मी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 347 आहे. गावाचे भौगोलीक क्षेत्र 280 हे असुन वहीतीखालील 135 हेक्टर क्षेत्र आहे.

मुत्तापुर गावामध्ये दिनांक 4/1/2015 ला सभा घेण्यात आली. या सभेला संवर्ग विका अधिकारी, तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सेवक तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेविषयी माहिती देण्यात आली शेतावर विविध उपचारांचा लाभ घेण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. सभेमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 15 शेततळे,4 बोडी नुतनीकरण व 17.00 हे . मजगी अशी एकुण 22 कामांचे नियोजन करण्यात येवून मार्च 2016 अखेर पूर्ण करण्यात आली.

शेततळे

सिध्दीविनायक गणपती मंदीर न्यास नवीमुंबई यांचे कडुन प्राप्त निधीमधुन एकुन 15 शेततळयाची कामे करण्यात आली. प्रती शेततळे 2196 घ.मी. प्रमाण,भरल्याने होनार आहे. अशाप्रकारे 2 ते 4 वेळा शेततळी पाऊसाच्या पाण्याने भरले तर पाण्याचा वापर खरीप व रब्बी हंगामातील पीकांकरीता होवुन पीकांचे उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होनार आहे.

मजगी

जलयुक्त शिवार योजनेत मजगीची 3 कामे 17.00 हे. क्षेत्रामध्ये करण्यात आली.मजगी क्षेत्रात धान पीकाची लागवड क्षेत्रात वाढ होवुन उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.

बोडी नुतनीकरण:

बोडी नुतनीकरणाचाही एकुण 4 कामे करण्यात आली. योजनेत निवड केलेल्या शेतकऱ्यांच्या जुन्या बोड्यांचे खोलीकरण करुन खोदलेली मातीचा बोडीच्या बांधावर भराव देण्यात आला व त्यामुळे 1 टिसीएम प्रमाणे 4 बोडी नुतनीकरणाने एकुण 4 टिसीएम पाणी उपलब्ध झाले. पीकांच्या पाण्याचा गरजेनुसार पाण्याचा वापर मुख्यत: धानपिकांमध्ये होणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे.

काम करण्यापुर्वी उपलब्ध पाणिसाठा हा अत्यल्प होता व काम पुर्ण झाल्यावार तसेच योजना राबविल्यानंतर पाण्याचा ताळेबंद गरजेनिरुप वाढला.

शेतकऱ्याचे मनोगत

लाभार्थ्याचे नाव : श्री अनंतु वारलु मडावी
गाव : मुत्तापूर
भ्रमणध्वनी : 9423597104

मी श्री अनंतु वारलु मडावी रा. मुत्तापुर येथील शेतकरी असून माझे नावे 2.00 हेक्टर क्षेत्र आहे. मुत्तापुर गाव हे अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात असून कुटूंबाचे उत्पन्न अत्यल्प असून दारिद्रयरेषेखाली मोडले जाते. कुटुंबातील सर्वच सदस्य हे अशिषित असल्याने शेती हा एकमेव उपजिविकेचे साधन आहे. शेती ही वडिलोपार्जीत असल्याने भाऊहिस्सेप्रमाणे खूपच कमी शेती मिळाली. शेती ही कोरडवाहू असल्याने व पाण्याचे कुठलेही साधन नसल्याने फक्त खरीप हंगामामध्ये पाऊसावर धानाचीच शेती केली जाते. पावसाच्या या अनियमिततेमुळे कधी -कधी कुटूंबापुरते देखील उत्पन्न मिळत नाही.

तालुका कृषी अधिकारी, अहेरी कार्यालयाकडून जलयुक्त शिवार अभियान योजनेसंबंधी माहिती मिळाली. कृषी विभागाच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जलदिंडी कार्यक्रमाव्दारे मृद व जलसंधारण कामे घेतल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशा प्रकारे होते. या बद्दल मार्गदर्शन केले. यानंतर मी मौजा - मुत्तापूर येथील सर्वे क्र. 94 मध्ये 30X30X3 मीटर आकाराचे शेततळे कृषी विभागाकडून घेतले. येत्या जून 2016 महिण्यात झालेल्या पहिल्याच पाऊसाने माझे शेततळे पुर्णपणे भरले आहे. त्या शेततळ्यावर आदिवासी विभागाकडून डिझल इंजन व पाईपचा लाभ घेतला असून मी सध्या 2.00 हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो, वांगे, मेथी इ. सारखा भाजीपाला घेत आहे. अहेरी बाजारपेठ गावापासून 8 किमी अंतरावर असल्याने मी रोज 600 ते 700 रुपये पर्यंत भाजीपाला विक्री करुन मोबदला मिळवीतो. योजना राबविण्यापूर्वी माझे वर्षाचे शेतीचे उत्पन्न हे 10 ते 12 हजार रुपये पर्यंतच होते. जेव्हापासून मला संरक्षित सिंचनाची सोय झाली तेव्हापासून मला भाजीपाल्यामध्ये वार्षिक उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये पर्यंत येण्याची अपेक्षा आहे. तरी सदर जलयुक्त शिवार अभियान योजना ही माझ्याकरीता जिवनदायी ठरलयासारखे आहे.

जलयुक्त शिवार अभियान सन 2014-15

अंतर्गत शाश्र्वत शेती अभियान
मौजा : वासामुंडी ता. एटापल्ली

जलयुक्त शिवार अभियानातुन वासामुंडी

गावाची विकासात्मक वाटचाल

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 150 किमी अंतरावर अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या एटापल्ली तालुक्यापासून 8 किमी अंतरावर 678 लोकसंख्या असलेले वासामुंडी हे गाव आहे. या गावातील सर्व कुटूंबांची उपजिवीका ही शेतीवरच अवलंबुन होती. पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून मिळणारे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसवतांना खुपच कसरत करावी लागायची. उत्पादनाची शाश्वती नव्हती तरीही उपजिवीकेसाठी शेतीशिवाय पर्याय नव्हता. या परिस्थितीत कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कार्यक्रमाची माहिती गावकऱ्यांना दिली. यातुन गावात ग्रामसभेतून माहिती व शिवार फेरीचे आयोजन करुन जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम वासामुंडी या गावात राबवायचा निर्धार शेतकऱ्यांनी पक्का केला.

सामुहिक शेततळ्याचे काम चालु करण्यासाठी गावातील श्री गजानन कुटा मडावी, श्री केये डोल्या वड्डे आणि श्री सतरु सोमा गावडे यांनी पुढाकार घेतला काम अतिशय चांगल्या पध्दतीने करण्यात आले. यांच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात सामुहिक शेततळ्यामुळे एक लाख ते दिड लाखापेक्षा जास्त वाढ होणार हे लक्षात येताच आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कामे करुन घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे गावात एकाच वर्षी 14 सामुहिक शेततळ्याची कामे पुर्ण करण्यात आली. यातून शेतात पाणि मुरल्यामुळे पहिल्याच पावसात गावातील विहिरी पुर्ण भरल्या. जलयुक्त शिवार अभियान राबविल्यानंतर गावातील शेतकऱ्यांना तिन्ही हंगामात पिक घेण्यास चालना मिळाली आहे.

पुर्वी पावसाअभावी शेतीतुन जेमतेम उत्पादन निघायचे, तर काही वेळा पीकही हातचे जायचे. माझ्या गावातील शेतात आता रब्बी हंगामातील पीके देखील घेता येतात त्यामुळे मला भाजीपाला पिकापासुन मला पन्नास हजार रुपयाचे उत्पादन मिळत आहे तसेच गावातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय करत आहे. यातून मला त्यांना दररोज नगदी आवक झाल्याचे दिसत आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे वासामुउी या गावाच कायापालट झाला आहे.

वासामुंडी गावातील पिकाच्या ऐन वाढीच्या काळात अनियमीतता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्यांचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. गावातील सिंचनाच्या सुविधांचा विचार करता मर्यादित सिंचन सुविधा, अनिश्चित व खंडीत जर्पन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी प्रकर्षाने राज्याच्या विकासामध्ये आव्हान ठरत आहे. गावात मागील चार दशकात कोरडवाहु क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात मोठया प्रमाणात चढ उतार दिसुन येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुण पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्र्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये वासामुंडी या गावाची निवड केलीद आहे. या गावाची पाण्याची पातळी मागील तीन वर्षापासुन काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसुन पडत आहे. सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडल्याचे मागील तीन वर्षापासून आढळले आहे. त्यामुळे येणाऱ्या उत्पादनात घट झाली व भूजल पातळीत एक ते तिन मीटरने कमी झाल्योच निदर्शनास आले.

वासामुंडी गावामध्ये जास्तीत जास्त आदिवासी लोकांची संख्या आहे. या गावात फक्त खरीप हंगामामध्येच पिकाची पेरणी केली जात होती. सिंचनाची सुविधा नसल्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकाची पेरणी केल्या जात नव्हती. परंतू जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम राबविल्यापासून या गावात आता खरीप हंगामातील पिकापासून पत्पादनात वीस टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच रब्बी हंगामात मोठया प्रमाणत कडधान्य पिकाची पेरणी झाली व भाजीपाला लागवड करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे मोठया प्रमाणात उंचावल्या गेला आहे.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम सन 2014-15 मौजा - आलेंगा (म) जलयुक्त शिवार अभियानातुन आलेंगा (म) गावाने साधला विकास

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 150 कि.मी. अंतरावर अतीदुर्गम व संवेदनशील असा एटापल्ली तालुका आहे. तालुक्या पासुन 15 कि.मी. अंतरावर 401 लोकसंख्या असलेले आलेंगा (म) हे गाव आहे. या गावातील सर्व कूटूंबाची उपजिवीका ही शेतीवरच अवलंबून होती. पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून मिळणारे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसवतांना खुपच कसरत करावी लागायची उत्पादनाची शाश्वती नव्हती तरीही उपजिवीकेसाठी शेतीशिवाय पर्याय नव्हता या परिस्थितीत कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाची माहिती गावकऱ्यांना दिली यातुन गावात ग्रामसभेतून माहिती व शिवार फेरीचे आयोजन करुन जलयुक्त शिवार अभियान या कार्यक्रमाचे महत्व पटवून सागण्यात आले. त्यामुळे गावातील शेतकरऱ्यांचा उत्साह वाढला. आपल्या गावात देखील पानलोटाची कामे जलयुकत शिवार अभियानातून झाली पाहिजेत यावर चर्चा होऊन जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम आलेंगा या गावात राबवायचा निर्धार शेतकऱ्यांनी पक्का केला.

बोडी खोलीकरणाचे काम चालू करण्यासाठी गावातील चुंडू लालसू मटामी यांनी पुढाकार घेतला. काम अतिशय चांगल्या पध्दतीने करण्यात आले. चुंटू मटामी यांच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात माती नाला बांधामुळे एक लाख ते दिड लाखापेक्षा जास्त वाढ होणार हे लक्षात येताच आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कामे करुन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावात एकाच वर्षी 38 बोडी खोलीकरणाची कामे पुर्ण करण्यात आली. यातुन शेतात पाणी मुरल्यामूळे पहिल्याच पावसात गावातील विहिरी पुर्ण भरल्या जलयुक्त शिवार अभियान राबविल्या नंतर गावातील विहिरी पुर्ण भरल्या जलयफक्त शिवार अभियान राबवल्या नंतर गावातील शेतकऱ्यांना तिन्ही हंगामात पिक घेण्यास चालना मिळाली आहे.

पुर्वी पावसाअभावी शेतीतून जेमतेम उत्पादन निघायचे तर काही वेळा पीकही हातचे जायचे. माझ्या गावातील शेतात आता रब्बी हंगामातील पीके देखील घेतात त्यामुळे मला भाजीपाला पिकापासून पन्नास हजार रुपयाचे उत्पादन मिळत आहे. तसेच गावातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय करत आहे. यातून मला त्यांना दररोज नगदी आवक झाल्याचे दिसत आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे आलेंगा (म) या गावाचा कायापालट झाला आहे.

आलेंगा (म) गावातील पिकाच्या ऐन वाढीच्या काळात अनियमीतता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्यांचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. गावातील सिंचनाच्या सुविधांचा विचार करता मर्यादित सिंचन सुविधा अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी प्रकर्शाने राज्याच्या विकासामध्ये आव्हान ठरत आहेत. गावात मागील चार दशकात कोरडवाहु क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठया प्रमाणात चढ उतार दिसून येत आहे. या परीस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुण देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आलेंगा (म) या गावाची निवड केलेली आहे. या गावाची पाण्याची पातळी मागील तिन वर्षापासून काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसुन पडत आहे. सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडल्याचे मागील तीन वर्षापासून आढळले आहे. त्यामु ळे येणाऱ्या उत्पादनात घट झाली व भूजल पातळीत एक ते तीन मीटरने कमी आहे.

आलेंगा (म) गावामध्ये जास्तीत जास्त आदिवासी लोकांची लोकसंख्या आहे. या गावात फक्त खरीप हंगामामध्येच पिकाची पेरणी केली जात होती. सिंचनाची सुविधा नसल्यामूळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकाची पेरणी केल्या जात नव्हती. परंतु जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम राबविल्यापासून या गावात आता खरीप हंगामातील पिकापासून उत्पादनात वीस टक्के वाढ झालयाचे दिसून आले. तसेच रब्बी हंगामात मोठया प्रमाणात कडधान्य पिकाची पेरणी झाली व भाजीपाला लागवड करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे मोठया प्रमाणात उंचावल्या गेला आहे.

शेतकऱ्यांचे मनोगत

मी श्री चुंटू लालसु मटामी रा. आलेंगा (म) येथील शेतकरी असून माझ्या शेतात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन 2014 - 15 मध्ये कृषी विभागामार्फत बोडी खोलीकरण करण्यात आला. हा बोडी खोलीकरण होण्यापुर्वी माझ्या बोडीत पाण्याची पातळी कमी असल्यामुळे शेतात कोणत्याही प्रकारची सिंचनाची सुविधा नव्हती त्यामुळे माझे धान हे पिक शेवटच्या पाण्याविणा कमी उत्पादन होत होते. त्यामुळे उत्पादनात फार मोठया प्रमाणात घ्ज्ञट झाली होती.

परंतु जलयुक्त शिवार अभियानातून माझ्या शेतामध्ये बोडी खोलीकरण झाल्यानंतर बोडीतील पाण्याची पातळी वाढली. खरीप हंगामात भात पिकाला योग्य वेळी पाण्याच्या पाळ्या देता आल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात वीस ते पंचविस टक्के वाढ झाली व रब्बी हंगामात भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन मी चालु वर्षात पालक, मेथी, वांगे व मिरची ची लागवड केली असून त्यापासून मला 45000/- रुपये उत्पादन मिळाले आहे. त्यापासून आर्थिक फायदा झाला मी या बोडीपासून मत्स्य व्यवसाय देखील केला मला त्यामधून 200 ते 250 किलो मासे विक्री करुन माझे आर्थिक जिवनमान उंचावण्यास जलयुक्त शिवार अभियानाने मला दिशा दाखवली.

जलयुक्त शिवार अभियान सन 2015 - 16 यशोगाथा "जलयुक्त शिवाराने दिली शाश्वत विकासाला गती"

प्रस्तावना

गडचिरोली हा पुर्व विदर्भातील एक प्रमुख भात पिकाची लागवड करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यास 1133009 हेक्टर इतके जंगलव्याप्त आहे तसेच 289506 हेक्टर इतके क्षेत्र असून सदरचे क्षेत्र 12 तालुक्यात विभागले गेले आहे. गडचिरोली तालुक्याच्या मुख्यालयापासून आग्नेय दिशेस 95 कि.मी. अंतरावर मुलचेरा तालुक्याचे मुख्यालय वसलेले आहे. मुलचेरा तालुक्यातील एकुण गावांची संख्या 68 आहे व एकूण लोकसंख्या 45,787 इतकी असून लागवडीलायक क्षेत्र 7695.30 हे. इतके आहे. मुलचेरा तालुक्यात एकुण लागवडीलायक क्षेत्रापैकी 77.33 टक्के (5950.92 हे.) इतके क्षेत्र जिरायती आहे. या तालुक्यात प्रामुख्याने भात या पिकाची लागवड केली जाते. सिंचन सुविधेचा अभाव, भात या पिकाची कमी उत्पादकता, आधूनिक तंत्रज्ञानाचा कमी वापर या प्रमुख समस्या या तालुक्यातील कृषी क्षेत्रास भेडसावत आहे. सन 2015 - 16 मध्ये जलयुक्त शिवार अभियान या अभियानाच्या मदतीने या समस्यावर मात करणे येथील शेतकऱ्यांसाठी शक्य झ्ज्ञालयाचे दिसून येते.

भूजल पातळीत वाढ घडवून आणणे मृद व जलसंधारनाच्या उपचाराच्या मदतीने होणारी मातीची धूप थांबविणे, पिण्यासाठी तसेच पशु पक्षांसाठी पाण्याचे शाश्वत साठ्यांची निर्मीती करणे तसेच जुन्या जलस्त्रोताचे पुनरज्जीवन करण्याच्या उद्देशाने मुलचेरा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या तालुक्यात विविध यंत्रणाच्या सहाय्याने तसेच समन्वयाने मुलचेरा तालुक्यातील 15 प्रमुख पाणि टंचाईग्रस्त गावांची निवड करुन गावनिहाय उपचारांची 312 कामांचे नियोजन करण्यात आले. यंत्रणेस उपलब्ध असलेल्या निधीतून तसेच सी.एस.आर. च्या माध्यमातून मिळालेल्या मृद व जलसंधारण संबंधी कामाच्या निर्मिती करण्यात आली. सन 2015 - 16 या आर्थिक वर्षात माहे फेब्रुवारी 2016 अखेर तालुक्यात कृषी विभागाने 51 कामे वन विभागाने 47 कामे उपविभागीय अधिकारी जि.प. सिंचाई चामोर्शी यांनी 8 कामे व उपविभागीय अधिकारी लघुसिंचन (जलसंधारण) यांनी चार कामे अशी एकूण 110 कामे पुर्ण करण्यात आली.

कृषी विभ्ज्ञाग व महसूल विभागाच्या महसूल विभागाच्या नियोजनानुसार सर्वप्रथम निवडलेल्या 15 गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले व लोकांना जलव्यवस्थापन व गावाच्या पाण्याच्या ताळेबंधाबाबत जागृत करण्यात आले. गावोगावी सभा, बैठकांच्या माध्यमातून अभियानाची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली या कार्यक्रमात तालुक्याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, चामोर्शी श्री. तळपादे तसेच तालुक्याचे तहसीलदार मा.श्री. पी.जी. अपाले यांनी शिवार फेरीत भाग घेऊन ग्रामस्थांच्या पाण्यासंबंधीच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानुसार तालुक्यातील यंत्रणा यांना सूचना देऊन गावनिहाय उपचारांचे नियोजन करण्यात आले. तालुक्यातील यंत्रणांनी त्यांचेकडील उपलब्ध असलेल्या निधीतून तसेच सी.एस.आर. च्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून मृद व जलसंधारण संबंधी कामाच्या निर्मीती करण्यात आली. या सर्व कामांची संकेतस्थळावर नोंद घेऊन कामे पुर्ण झाल्यानंतर उपचाराचे फोटो अपलोड करुन या अभियानास डिजिटल रुप देण्यात आले.

यंदाच्या वर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या कमी पर्जन्याची नोंद मुलचेरा तालुक्यात घेण्यात आली तसेच भात पिकाच्या वाढीच्या कालावधीत एकूण 49 दिवसांचा पावसाचा खंड आढळून आला. अशा परिस्थितीत देखीनल मुलचेरा तालुक्यात 7700 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून 29 शेततळ्यांची निर्मीती करण्यात आली असून त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीस संरक्षक सिंचनाची सुविधा देऊ शकले. निर्माण झालेल्या पाणी साठयामूळे काही शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले आहेत त्यामूळे लोकांना शेतीबरोबर जोडधंद्यस वाव मिळाला आहे. निवडण्यात आलेल्या भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढले. साठवण बंधारा दुरुस्तीच्या कामांमुळे लगतच्या विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले. वन तलावांच्या निर्मीतीमुळे जंगली जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली. खोल सलग समतल चर या उपचाराच्या निर्मितीमुळे मृद व जलसंधारणास मदत झाली. मजगीच्या कामांमुळे लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. त्यामूळे खरीप हंगामात 8500 हेक्टर विविध पिकांची लागवड झाली. सिमेंटनाला बंधाच्या कामामुळे पाणीसाठे निर्माण झाले असून भूजल पातळीत वाढ झाली आहे.

मुलचेरा तालुक्यात सरासरी 1450 मिमी. इतका पाऊस पडतो यापैकी बरेचशे पाणी वाहून जाते परंतु या वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे. कारण शेतीसाठी बारमाही पाणी पुरवठा करणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने कमी खर्चात परंतू शाश्वत जलसाठे तयार करुन वाहनारा अपव्यव अडविणे व भूजल पातळीत सुधारणा घडवून आणने ह्या गोष्टी या अभियानाच्या माध्यमातून साध्य करण्यात यश प्राप्त झाले आहे. तसेच लोकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत देखील जागृती झाल्याचे आढळून आले आहे. कृषी विकासासाठी मृदा तसेच जल या नैसर्गिक साधनाचा सुव्यवस्थित वापर करुनच कृषी क्षेत्रात शाश्वत विकास साधला जाऊ शकतो. ही गोष्ट आता जनमानसात गाजते आहे. शाश्वत पाणीसाठे, कृषीक्षेत्र विस्तार, कृषी विशेषीकरण, जोडधंद्यांची निर्मीती याव्दारे शाश्वत विकास साधला जात आहे व अशा शाश्वत विकासाची हमी म्हणजेच जलयुक्त शिवार अभियान असे म्हणावे लागेल.

मनोगत

माझे नाव महादेव अधिरचंद दत्त असून मी मुलचेरा तालुक्यातील मौजा शान्तिग्राम येथील रहिवाशी आहे. माझी 1.44 हेक्टर एवढी जमीन आहे. माझी शेती ही जिरायत होती बारमाही पाण्याची सोय माझेजवळ उपलब्ध नव्हती स्वत:ची बोअरवेल घेण्याची माझी आर्थिक स्थिती नव्हती त्यामुळे मी खरीप हंगामात भात हे एकमेव पिकाची लागवड करु शकत होतो. मला कृषी सहाय्यक पी.एस. धोटे यांनी जलयुक्त शिवार अभियान या योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मी माझ्या शेतीत शेततळे बनविण्याचे ठरविले. परंतु, गावातील काही मित्र मला शेततळे घेण्यापासून परावृत्त करीत होते. त्यांच्या मते शेततळे बनविल्यामुळे जास्त जमीन खर्च होते. अशा परिस्थितीत मला कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन मिळाले व कृषी पर्यवेक्षक पराते यांनी माझ्या मनातील शंका दूर केल्या व माझ्या शेतीत 25 x 25 x 3 मी. या आकारमानाचे शेततळे तयार करण्यात आले.

पुर्वी मी भात पिकाची लागवड करत होतो व त्यापासून माझ्या कुटूंबास खर्च वजा जाता वार्षिक रु. 30000/- रुपये एवढे उत्पन्न मिळत होते. या वर्षी मी माझ्या शेतात भात पिकासोबत मिरची, भेंडी, वांगी यासारखी पिके घेऊ शकलो व त्यामुळे मला या वर्षी खर्च वजा जाता रु.55000/- इतके उत्पन्न माझे शेतीपासून प्राप्त झाले आहे. म्हणजे मला रुपये 25000/- चे अतिरीक्त उत्पन्न प्राप्त झाले. सध्या माझा मत्स्य पालन करण्याचा विचार आहे. कारण मला या व्यवसायापासून रुपये 15000/- चे अधिक उत्पन्न मिळविता येऊ शकेल व माझेजवळ असणाऱ्या जमिनीचा देखील मी सुयोग्यरित्या वापर करु शकेल अशी मला अपेक्षा आहे.

या योजनेच्या माध्यमातून माझ्या कुटुंबास अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले असून एका वर्षात एक पिकापेक्षा अधिक पिके घेणे मला शक्य झाले आहे. व मत्स्य पालनाव्दारे मला एक उत्तम जोडधंदा मिळाला आहे व माझ्या कुटुंबास अर्थिक आधार मिळाला आहे. त्याबद्दल मी कृषी विभागाचा अत्यंत आभारी आहे.

त्यावेळी अव्वल प्ले विराम