सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गासाठी उपयुक्‍त जलयुक्‍त शिवार अभियान

आकाशात पतितंम तोयं। यथा गच्‍छती सागरम्। सर्व देव नमस्‍कारः केशवम् प्रती गच्‍छती । सुभाषितकारांच्‍या या म्हणण्‍यानुसार आकाशातून पडणारं पावसाच पाणी शेवटी सागराला मिळत; तद्वतच कोणत्‍याही देवाला श्रध्‍देन केलेला नमस्‍कार हा शेवटी केशव म्‍हणजे विष्‍णूला प्राप्‍त होतो. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. यंदा तर सुमारे 3800 मिलि मिटर पाऊस झाला आहे. तथापि पावसाच पडणार पाणी बहुतांशी सागराला जाऊन मिळते. उन्‍हाळी शेतीला किंवा पिण्‍यासाठी म्‍हणून त्याचा फारसा उपयोग होत नाही. यावर पाणी आडविण्‍याचा नामी उपाय जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्‍ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवाजीराव शेळके यांच्‍या जिल्ह्यातील जलयुक्‍त शिवारच्‍या वाटचाली संदर्भात झालेला हा संवाद.

प्रश्‍न - सिंधुदुर्ग जिल्‍ह्याला जलयुक्‍त शिवार अभियान कितपत उपयुक्‍त आहे ?

श्री. शेळके - जलयुक्‍त शिवार अभियान हे सिंधुदुर्ग जिल्‍ह्यासाठी वरदानच आहे अस माझ मत आहे. पावसाच उपलब्ध पाणी नियोजनपूर्वक अडविल आणि उपलब्ध पाण्‍याच्‍या माध्‍यमातून इथल्‍या शेतक-यांनी उन्‍हाळी शेती, आंबा, नारळ, काजू, कोकम यांच्‍या बागा फुलविल्‍या तर स्‍वच्‍छतेत आपला जिल्‍हा देशात प्रथम आला तद्वतच आपला सिंधुदुर्ग जिल्‍हा कृषि व कृषि पूरक उद्योगाच्‍या सहाय्याने देशातला सर्वात श्रीमंत जिल्‍हा होईल असा मला विश्‍वास आहे. निसर्गसंपन्‍न अशा या जिल्‍ह्यात शेतक-यांनी मेहनतीची कास धरायला हवी.

प्रश्‍न- जलयुक्‍त शिवारची आतापर्यंतची वाटचाल कशी झाली आहे ?

श्री. शेळके - गतवर्षी जिल्‍ह्यातील 35 गावांची निवड केली होती. या गावात 597 कामे प्रस्‍तावित केली होती. यापैकी 469 कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत. यामधुन 1 हजार 962 टी. सी. एम. पाणी साठा झाला असून 831 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येण्‍यास मदत झाली आहे.

प्रश्‍न- यामध्‍ये लोकसहभाग कसा होता ?

श्री. शेळके - जिल्‍ह्यात विशेषतः गाळ काढण्‍याच्‍या कामात लोकांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग होता. सिंध्‍दी विनायक ट्रस्‍ट मुंबई, एल. आय. सी. यांचेकडून दोन कोटी रुपयांच्‍या वर निधी दिला जाणार आहे. लोकसहभागातून भंगसाळ नदी, पेंडूर आदी ठिकाणी 78 लक्ष रुपये गाळ काढण्‍यासाठी लोकसहभागातून खर्च करण्‍यात आले.

प्रश्‍न- यंदाच्‍या वर्षीचा अभियानाचा कार्यक्रम कसा आहे ?

श्री. शेळके - यंदाच्‍या वर्षी 23 गावांची निवड केली असून 428 कामे प्रस्‍तावित करण्‍यात आली आहेत. यासाठी एकूण 31 कोटी 36 लक्ष रुपये निधीची तरतूद करण्‍यात आली आहे. वर्ग एक दर्जाच्‍या अधिका-यांनी समन्‍वय अधिकारी ी

प्रश्‍न- वळण बंधा-यांच्या धडक कार्यक्रमाची माहिती सांगा.

श्री. शेळके - सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात छोटे नाले- ओढे इकडे त्‍यांना वहाळ म्हणतात. यांची संख्‍या जास्‍त आहे. या वहाळांवर वळण बंधारे बांधले तर मोठ्या प्रमाणात उन्‍हाळी हंगामासाठी पाणी उपलब्‍ध होण्‍यास मदत होणार आहे. यासाठी जिल्‍ह्यात एक हजार वळण बंधारे बांधण्‍याचा धडक कार्यक्रम राबविण्‍याचे यंदाच्या वर्षी नियोजन आहे. या वळण बंधा-यांच्‍या धडक कार्यक्रमामुळे छोट्या गावात जलसाठे निर्माण होण्‍यास मदत होणार आहे.

प्रश्‍न- पाणी उपलब्‍धतेमुळे शेती उत्‍पादनात कशी वाढ होणार आहे ?

श्री. शेळके - सिंधुदुर्गात वायंगणीच भात म्हणून काही ठरावि‍क भागात उन्‍हाळी भात घेतल जात. पण याच क्षेत्र खूपच कमी आहे. वळण बंधारे व जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत होणा-या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर जिल्‍ह्यात जलसाठे निर्माण होण्‍यास मदत होणार आहे. दुबार किंवा उन्‍हाळी हंगामात इथले शेतकरी भाजी - पाला, वाल, काकडी, टरबूज या फळपिकांबरोबर भात, कुळीथ, भुईमुग, तीळ ही पिके घेऊ शकतो. संरक्ष‍ित पाणीसाठा निर्माण झाल्‍याने नारळ, काजू, आंबा बागांना पाणी मिळेल. उन्‍हाळी हंगामात नारळ, काजू बागांना पाणी मिळाले तर उत्‍पादन दीडपट ते दुप्‍पट वाढण्‍यास मदत होणार आहे.

प्रश्‍न- भाताची श्री पध्‍दत म्‍हणजे काय ?

श्री. शेळके- आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्‍कार त्‍यातुनही भाताची श्री पध्‍दत विकसीत झाली आहे. भाताची एकच काडी लावायची. ठराविक दिवसांनी खाचरातील पाणी काढायचे पुन्हा काही कालावधीनंतर पाणी भरायचे यामुळे भाताच उत्‍पादन दीडपट होते. बियाण पारंपारिक पध्‍दतीन प्रती हेक्‍टरी 40 किलो लागत पण श्री पध्‍दतीने केवळ 7 किलो पुरेस होत. बियाणातही शेतक-यांचे पैसे वाचतात. त्‍यामुळे अल्‍पावधीत ही योजना सिंधुदुर्गात लोकप्रिय झाली आहे. जिल्‍ह्यात एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविला आहे.

प्रश्‍न - जलयुक्‍तला चळवळीच स्‍वरुप का याव अस वाटत ?

श्री. शेळके - सिंधुदुर्गचा विचार केला तर पावसाच मोठ्या प्रमाणावर या जिल्‍ह्यात पाणी उपलब्‍ध होत. पण ते पाणी पुरेपुर आडविण्‍यासाठी या जलयुक्‍त शिवार अभियानाला चळवळीच स्‍वरुप यायला हव. लोकसहभागाच प्रमाणही वाढायला हव. जलयुक्‍त शिवार अंतर्गत होणारी काम आपली स्‍वतःची काम आहेत. अशी जाणीव ठेऊन शेतक-यांची त्‍या कामांची काळजी घ्‍यायला हवी. शेतातील माती शेतातच रहावी यासाठी दक्षता घ्‍यायला हवी. जमिनीची सुपिकता कायम रहावी यासाठी जमिनीची धूप होणार नाही. याची देखभाल करावी. अल्‍प भूधारक शेतक-यांची संख्‍या जास्‍त असल्‍याने छोटे – छोटे जलसंधारणाचे उपचार या जिल्‍ह्यात प्रभावी ठरु शकतात. या अनुषंगाने जलयुक्‍त शिवार हे अभियान चळवळ होण आवश्‍यक आहे.

जलयुक्‍त शिवारमुळ कुवळे गावाचा शेती विकास

कुवळे हे गांव तालुका कृषि अधिकारी, देवगड व मंडळ कृषि अधिकारी, शिरगांव अंतर्गत असून ते तालुक्‍याच्या ठिकाणापासून साधारणपणे 33 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर सह्याद्रीच्‍या डोंगर द-यामध्‍ये वसलेले एक छोटेसे गांव आहे. ह्या गावामध्‍ये भात व नागली पिक प्रामुख्‍याने खरीप हंगामात घेतले जाते. तसेच निर्यातक्षम आंबा पिक देखिल मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

या गावचे भौगोलिक क्षेत्र 2228.16 हेक्‍टर असून एकूण महसुल खातेदार संख्‍या 582 इतकी आहे. व लोकसंख्‍या एकुण 1553 आहे. तसेच भात पिकाखालील क्षेत्र 55.60हेक्‍टर, नागली पिकाखालील क्षेत्र 2.00 हेक्‍टर, भुईमूग पिकाखालील क्षेत्र 1.00 हेक्‍टर, आंबा पिकाखालील क्षेत्र 7820 हेक्‍टर व काजु पिकाखालील क्षेत्र 107.80, नारळ 5.50 हेक्‍टर क्षेत्रावर इत्‍यादी विविध पिके घेतली जातात. तसेच रब्‍बी हंगामात थोड्या फार प्रमाणात भुईमूग, चवळी, भाजीपाला इत्‍यादी पिके घेतली जात. परंतु इत्‍यादी विविध पिके घेत असतांना खरिप हंगामात विशेषतः भात पिकाच्‍या बाबतीत बोलावयाचे झाल्यास 8 ते 10 दिवसाचा एखाद वेळेस पावसाचा खंड पडल्‍यास पिकास शाश्‍वत पाण्‍याची सोय नसल्‍यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्‍पन्‍न कमी प्रमाणात मिळत होते. तसेच रब्‍बी व उन्‍हाळी हंगामात विविध पिके घेण्‍यासाठी नाल्‍यांना व विहीरींना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नव्‍हते. त्‍यामुळे शेतक-यांना इच्‍छा असून देखिल विविध पिके घेणे शक्‍य नव्‍हते. त्‍याच बरोबर लोकांना व गुरांना देखिल एप्रिल, मे महिन्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असे. पर्यायाने गावात पाणी आडवून- जिरवून गावातील पाणी पातळीत वाढ करणे गावक-यांना आवश्‍यक वाटले व त्‍याच वेळी महाराष्‍ट्र शासनाची जलयुक्‍त शिवार अभियान ही नवीनच योजना गावात नदी – नाल्‍यावर छोटे- छोटे बंधारे बांधुन भूगर्भातील व नदी - नाल्‍यातील पाणी पातळीत वाढ करणे ह्या योजनेचा लाभ घेण्‍याचा सर्वानुमते ठरले. व त्‍याप्रमाणे गावात ग्रामसभेचे आयोजन करून चर्चा करून व गावात शिवार फेरीचे आयोजन करून सदर गावचा जलयुक्‍त शिवार अभियाना अंतर्गत जल आराखडा तयार करण्‍यात आला.

या गावाची जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत निवड झाल्‍यानंतर गावातील नदी- नाल्‍यावर तसेच माथा ते पायथा डोंगर-उतारावर महाराष्‍ट्र शासन कृषि विभाग तसेच इतर विभागामार्फत सिमेंट नालाबांध-5 तसेच एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत - सिमेंट नाला बांध - 8, वळण बंधारा -1, सलग समतल चर- 65.08, मातीनाला बांध -3, घळीबांध -200 इत्‍यादी कामे झालेली आहेत.

सदरच्‍या विविध प्रकारच्‍या जलसंधारण उपचार पध्‍दतीच्‍या कामामुळे गावातील पडणारे पावसाचे पाणी व माती माथा ते पायथा अडवून व भूगर्भात जिरवून पाण्‍याची साठवणूक केल्‍यामुळे नदी -नाले व विहीरीची पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्‍याच प्रमाणे वळण बंधा-यामुळे नाल्‍याचे पाणी वळवुन पाटाव्‍दारे शेत जमिनीस देणे शक्य झाल्‍याने खरिप हंगामात विशेषतः भात पिकाच्‍या बाबतीत पावसाचा खंड पडल्यानंतर जी काही प्रमाणात उत्‍पन्‍नात घट यायची ती उत्‍पन्‍नातील घट शाश्‍वत पाण्‍याची व्‍यवस्‍था असल्यामुळे येत नाही. त्‍याच प्रमाणे रब्‍बी व उन्‍हाळी हंगामात पाण्‍याची पिकास हमखास सोय झाल्‍यामुळे शेतकरी वर्ग हळूहळू भुईमूग, सुर्यफूल, चवळी, कुळीथ, मका व भाजी पाल्‍यासारखी पिके घेवून आपला भाजीपाला काही प्रमाणात पंचक्रोशीच्‍या आठवडा बाजारात विक्री करून आपला चरितार्थ चालविण्‍याचे सामर्थ्‍य त्‍यात आले आहे. एवढेच नव्‍हे तर शेतकरी आता मोठ्या प्रमाणात पिके घेण्‍याकडे वळलेला आहे.

त्‍याचप्रामणे पुर्वी एप्रिल व मे महिन्‍यामध्ये जी काही पिण्‍याच्‍या पाण्‍याची लोकांची व गुरांची गैरसोय व्‍हायची ती आता पुर्णपणे थांबलेली असून आता गांव पाण्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपुर्ण झालेले आहे. ही सर्व किमया महाराष्‍ट्र शासन कृषि विभागाच्‍या जलयुक्‍त शिवार अभियान योजनेची फलश्रृती आहे.

मिलिंद बांदिवडेकर
जिल्‍हा माहिती अधिकारी,
सिंधुदुर्ग
त्यावेळी अव्वल प्ले विराम