उस्मानाबाद

जलयुक्त शिवार अभियानामुळे दहा हजार टीसीएम पाणी जिल्यातील 254 गावांचे शिवार बहरले अकरा हजार हेक्टर शेतीला झाला फायदा

उपेंद्र कटके उस्मानाबाद

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पासामुळे जलयूक्त शिवार अभियानाची उपयूक्तता सिध्द झाली आहे.गेल्या दोन वर्षामध्ये काम झालेल्या 254 गावांमध्ये पुर्ण क्षमतेणे म्हणजे 15 हजार 774 टीसीएम पाणी साठले आहे.

शेती व्यवसायाला उर्जिततावस्था देण्यासाठी शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. केवळ भूगर्भातील जलसाठी व प्रकल्पातून पाणी आणून शेतीची तहान भागवणे गेल्या तीन वर्षात अशक्य झाले होते.900 फुटांपर्यंत कूपनलिका खोदूनही पाणी मिळत नव्हते.यामुळे रिकामे होणारा भूगर्भा्रतील साठा पुन्हा भरण्याची गरज होती तसेच पारंपरिक नदया,नाले,ओढे बुजून गेले होते.गावावर पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जात होते.यामुळे पावसाचा फायदा घेताच येत नव्हता.या परिस्थ्सितीवर मात करण्यासाठी शासनाने दोन वर्षापासून जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले जिल्हाधिकारी डॉ.प्राशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनानेही संपूर्ण शक्ती पणाला लावून शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी केली. मात्र गेल्या वर्षी व या वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस झाला नाही. यामुळे अभियानाचा फायदा दिसून आलाच नाही.

गेल्या 15 ते 22 दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामूळे आता अभियानाची उपयुक्तता सिध्द होत आहे. गेल्या वर्षी निवडलेल्या सर्व 217 व यावर्षी निवडलेल्या 191 पैकी 37 अशा 254 गावांमध्ये अभियानातून कामे झाली आहेत.या कामांमुळे 18774.65 टीसीएम पाणी साठवण्याची क्षमता कामांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या आठवडयापूर्वी 10383.97 टीसीएम पाणीसाठा झाला होता आता पूर्ण म्हणजे 18.774365 टीसीएम पाणी साठले आहे या पाण्यामुळे 11 हजार 643. हेक्टर 69 गुंठे क्षेत्र्‍ पाण्याच्या दृष्टीने संरक्षित झाले आहे. आगामी रब्बी हंगाम शेतक-यांना फलदाई ठरणार आहे

19 हजार कामे

जिल्यात कंपार्टमेंट बंडींग,शेततळे,सिमेंट नाला,नाला सरळीकरण व खोलीकरण,लोकसहभागातून गाळ काढणे,कोल्हापूरी बंधा-यांची दुरुस्ती,विहीर पुनर्भरण आदी प्रकारची 19 हजार 282 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.तसेच सात हजार 820 कामे प्रगतीपथावर आहेत. सध्या यातील काही कामे पुर्ण झाल्यानंतर आणखी जलसाठयाची क्षमता वाढणार आहे,

प्रकल्प भरण्यास विलंब

मुबलक पाऊस पडूनही काही प्रकल्प भरण्यास पूर्वीपेक्षा अवधी लागला. जलयुक्त शिवार अभियानामूळे पावसाचे पाणी पुढे न जाता तेथेच राहिले. तेथील कामाची क्षमता संपल्यावर पाणी पुढे सरकले.यानंतर सर्व प्रकल्प व तलाव भरु शकले. प्रकल्पापासून दूर असलेल्या गावांमध्ये अभियानामुळे पाणी थांबू शकले.

पाणी पातळी वाढणार

गेल्या वर्षी भागात पाऊस पडला तेथे अभियानातील कामांमध्ये पाणी साठले. तसेच मोठयाप्रमाणात पाणी मुरले. यामुळे परिसरातील कुपनलिका,विहिरींची पाणी पातळी वाढली होती. आताही येथील पाणीपातळी वाढण्यास चांगली मदत होणार आहे. नदी ओढयापासून दूर असलेल्या शेतकऱ्यांनाही यामुळे फायदा होणार आहे.

शेतीला फायदा

दिर्घकालीन फायद्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. याची शेतीला निश्चितच फायदा होणार आहे. अभियानामुळे पाणी जमिनीत वेगाने मुरुन पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे.-कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी श्री. शिरीष जमदाडे.

जिल्हयात 408 गावांची निवड 254 गावांत कामे 02 वर्षापासून अभियान 10384 टीसीएम पाणी 11643 हेक्टरला फायदा 19282 पूर्ण कामे सुमारे अडीच कोटी घनमीटर गाळाचा उपसा 34 दलघमीने वाढली तलावांची क्षमता चार वर्षापासून काढला जात आहे गाळ जिल्हयातील विविध प्रकल्पांमधून गेल्या चार वर्षापासून गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी गाळ काढून शेतात टाकला यामुळे शेती सुपिक होण्यास मदत तर झालीच आहे तसेच प्रकल्पांची पाण्याची क्षमता 36 दलघमीने वाढली आहे.

जिल्हयातील सर्वच लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये मोठयाप्रमाणात गाठ साठला होता. अनेक वर्षापासून गाळ काढण्यात न आल्यामुळे वरचेवर गाळ साठत होता. यामुळे प्रकल्पांची पाण्याची क्षमता कमी झाली होती. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण कमी पावसातही पूर्णपणे भरुन वाहिले होते. जिल्हयातील सर्वच भागातील प्रकल्पांमध्ये गाळ सठलेला होता. गेल्या चार वर्षापूर्वी प्रशासनाच्या वतीने गाळ काढून नेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. यावेळी शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्याचे जाहीर करुन पोकलेनसाठी अनुदानही दिले. तसेच गाळ काढून नेताना अडवणून झाल्यास कारवाई करण्यात आली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना 2013 मध्येच 129 लहान-मोठया तलावातून गाळाचा उपसा सुरु केला. त्यावेळी एक कोटी 22 लाख 90 हजार 496 घनमीटर गाळाचा उपसा केला होता. यामुळे 12.29 दलघमी पाणी साठण्याची क्षमता निर्माण झाली होती.

2013 नंतर पाटबंधारे विभागाने गाळाच्या उपसंदर्भातील रेकॉर्ड ठेवले नाही. मात्र त्यानंतरही सातत्याने तीन वर्ष म्हणजेच ऑगस्ट 2016 पर्यंत गाळाचा उपसा सुरुच होता. त्यामुळे अंदाजे दाने काटी 50 लाख घनमीटर उपसा झाल्याची शक्याता आहे. यामुळे सर्व प्रकल्पांची 36 दलघमी पर्यंत क्षमता वाढली असल्याचा अंदाज आहे.

2300 रिचार्ज शाप्ट जिल्हयात 2300 पेक्षा अधिक रिचार्ज शॉफटची कामे झाली आहेत. विशेष म्हणजे भूजल सर्वेक्षण विभागाने जलयुक्त शिवार अभियानाची कामे झालेल्या ठिकाणी प्राधन्याने रिचार्ज शाफट तयार केले आहेत. यामुळे पासाचे साठलेले पाणी वेगाने जमिनीत मुरले,परिणामी गेल्या अनेक वर्षापासून बेसूमार उपशामुळे रिकामा झालेला भूभाग पुन्हा रिचार्ज होत आहे. याचाही फायदा होणार आहे.

जलयुक्त शिवारांन उस्मानाबाद फुललं

राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे उस्मानाबाद

जिल्हयातील जलसाठ्याबरोबरच भूर्गभातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियान वाढण्यास मदत झाली आहे.जलयुक्त शिवार अभियान एक प्रकारे शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.जिल्हयात झालेल्या कामामुळे सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

राज्य शासनाने राज्यातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्र 2019 पर्यंत टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून,या अभियानाची सुरूवात 2015 मध्ये करण्यात आली.जमीनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते पाणी जमीनीत जिरविणे आणि भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानातून प्रत्येक वर्षी जिल्हयातील काही गावांची निवड करायची आणि त्या गावात या अभियानाच्या माध्यमातून जलसंधरणाची कामे करायची. या अभियानासाठी 2015-2016 मध्ये राज्य सरकारने यासाठी राज्यातील सहा हजार गावांची निवड केली. यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 217 गावांचा समावेश होता. उस्मानाबाद जिल्हयातील पहिल्याच वर्षी या अभियानाअंतर्गत 21 हजार 25 कामे हाती घेण्यात आली. मात्र,गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला नसल्याने जलयुक्त शिवार अभियानाचा म्हणावा तसा प्रभाव दिसला नाही.

सन 2016-17 या वर्षात राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यात 5 हजार 281 गावांची निवड केली. यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 191 गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये 16 हजार 467 कामे प्रस्तावित करण्यात आली.

जलयुक्त शिवारामधील जलसंधवर्धनाच्या कामात कंर्पाटमेंट बंडिंग, मातीनाल बांध, नाला सरळीकरण व खोलीकरण,सिमेंट नाला, नदी नाले पाझर तलाव व ओढयामधील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, शेततळी आदी कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये यंदयच्या वर्षी सप्टेंबरअखेर चांगला पाऊस झाल्याने मोठया प्रमाणात पाणी साठले आहे. याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळी वाढ होण्यास झाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कोरडे असणारे बोअर, विहिरी जलयुक्तच्या कामामुळे पाण्याने भरल्या आहेत.बोअरला मुबलक पाणी येऊ लागले आहे. 2015-16 मध्ये जिल्हयात करण्यात आलेल्या जलयुक्तच्या कामामुळे 18 हजार 441.76 टीएमसी पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित होते. सप्टेंबर 2016 अखेर झालेल्या दमदार पावसामुळे या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्षात 10 हजार 502.25 टीएमसीइतका पाणीसाठा झाला आहे.तर विहिरीच्या पाणीसाठयात सुमारे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमुळे जिल्हयातील सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

2016-17 मध्ये हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे 224 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, या परिसरातील विहिरीचे पाणी सुमारे साडेतीन मीटरने वाढले आहे.तर सुमारे 463 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे.

(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी,
उस्मानाबाद
त्यावेळी अव्वल प्ले विराम